PPF Investment : आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक पालक पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी योजनेला पसंती देतात. सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत यामुळे ही योजना लोकप्रिय आहे. मात्र, मुलांच्या नावे खाते उघडताना अनेक पालक अशा काही चुका करतात, ज्याचा थेट फटका त्यांच्या खिशाला बसतो. विशेषतः गुंतवणुकीच्या मर्यादेबाबत असलेल्या अज्ञानामुळे अनेकांचे व्याजाचे उत्पन्न बुडत असल्याचे समोर आले आहे.
पालकांसाठी सर्वात मोठा 'ट्रॅप'
- पीपीएफच्या नियमानुसार, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही मर्यादा पालकाचे स्वतःचे खाते आणि मुलाचे खाते मिळून आहे.
- उदाहरण : जर बाबांनी स्वतःच्या पीपीएफ खात्यात १.५ लाख रुपये भरले असतील आणि मुलाच्या खात्यात पुन्हा १ लाख रुपये भरले, तर मुलाच्या खात्यातील त्या १ लाख रुपयांवर एक रुपयाही व्याज मिळणार नाही. जास्तीच्या रकमेवर व्याज मिळत नसल्याने १५ वर्षांच्या कालावधीत चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा गुंतवणूकदार गमावतो.
पालकांकडून होणाऱ्या ३ प्रमुख चुका
- वेगवेगळ्या मर्यादा समजणे : पालकांना वाटते की मुलाचे खाते स्वतंत्र असल्याने तिथे वेगळी १.५ लाखांची मर्यादा मिळेल. मात्र, मूल १८ वर्षांचे होईपर्यंत पालकांची आणि पाल्याची गुंतवणूक मर्यादा एकत्रितपणे १.५ लाखच राहते.
- दोन खाती उघडणे : एका मुलाच्या नावे संपूर्ण देशात फक्त एकच पीपीएफ खाते असू शकते. जर बँक आणि पोस्ट ऑफिस अशा दोन ठिकाणी खाती उघडली, तर ते बेकायदेशीर ठरते आणि दुसरे खाते गोठवले जाऊ शकते.
- कर सवलतीचा चुकीचा दावा : 'कलम ८० सी' अंतर्गत केवळ १.५ लाखांपर्यंतच कर सवलत मिळते. त्यापेक्षा जास्त रकमेवर सवलत मागितल्यास प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते.
१८ वर्षांनंतरचे चित्र बदलते!
- जोपर्यंत मूल अल्पवयीन आहे, तोपर्यंत पालक त्याचे खाते सांभाळतात. मात्र, मूल १८ वर्षांचे झाले की
- खाते पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात येते.
- त्यानंतर त्याची स्वतंत्र १.५ लाख रुपयांची मर्यादा सुरू होते.
- अशा वेळी संपूर्ण कुटुंब मिळून (पालक + सज्ञान मूल) ३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून पूर्ण व्याजाचा लाभ घेऊ शकते.
वाचा - बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर
गुंतवणूकदारांसाठी 'स्मार्ट' टिप्स
- एप्रिलमध्येच गुंतवणूक करा : आर्थिक वर्ष सुरू होताच ५ एप्रिलपूर्वी पैसे भरल्यास संपूर्ण वर्षाच्या व्याजाचा लाभ मिळतो.
- एकुण रक्कम तपासा : स्वतःच्या आणि मुलाच्या खात्यातील एकूण गुंतवणूक १.५ लाखांच्या वर जाणार नाही याची काळजी घ्या.
- व्याजदर : सध्या वार्षिक ७.१% व्याजदर मिळत असून तो पूर्णपणे करमुक्त आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : PPF for children? Avoid these mistakes or lose interest!
Web Summary : Opening a PPF account for children requires caution. Exceeding the ₹1.5 lakh limit across both parent and child accounts leads to loss of interest. Avoid multiple accounts and incorrect tax claims for maximum benefit.
Web Summary : Opening a PPF account for children requires caution. Exceeding the ₹1.5 lakh limit across both parent and child accounts leads to loss of interest. Avoid multiple accounts and incorrect tax claims for maximum benefit.
Web Title : बच्चों के लिए PPF? ये गलतियाँ करने से ब्याज का नुकसान!
Web Summary : बच्चों के लिए PPF खाता खोलते समय सावधानी बरतें। माता-पिता और बच्चों के खातों में मिलाकर ₹1.5 लाख की सीमा से अधिक होने पर ब्याज का नुकसान होता है। अधिकतम लाभ के लिए कई खाते और गलत कर दावे से बचें।
Web Summary : बच्चों के लिए PPF खाता खोलते समय सावधानी बरतें। माता-पिता और बच्चों के खातों में मिलाकर ₹1.5 लाख की सीमा से अधिक होने पर ब्याज का नुकसान होता है। अधिकतम लाभ के लिए कई खाते और गलत कर दावे से बचें।